Pic by madhu nimkar
‘न्यूयॉर्क’ आणि ‘नायगारा
फॉल्स’ ही ठिकाणे सुद्धा लवकरच बघून झाली. मन ह्युस्टन मध्ये रमल्याने अजून एक वर्ष
अमेरिकेत राहायला हरकत नाही अशी खात्री पटली.
“इतने साल
अमेरिका में रेहके भी ‘न्यूयॉर्क’ नहीं देखा, तो क्या किया?” हा सवाल एकदाचा
संपवून टाकायचा निर्णय घेऊन एकदाचा दौरा ठरवला आम्ही...
अमेरिकेतील
सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर, ग्लोबल पावर सिटी, तसेच अर्थशास्त्र, वित्तशास्त्र, प्रसारमाध्यमे, कला, fashion, संशोधन, तंत्रज्ञान, शिक्षण , आणि मनोरंजन. युनायटेड नेशन्सची प्रमुख हेड क्वार्टर, तसेच इंटरनेशनल डिप्लोमसी चे प्रमुख केंद्र आणि जागतिक
सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्राची राजधानी. एकूण काय ‘न्यूयॉर्क’
विषयी किती हि लिहिला तर कमीच आहे...
आम्ही
मात्र एक प्रेक्षणीय स्थळ म्हणूनच ते बघायला गेलेलो...
‘न्यूयॉर्क’ मध्ये
जुने-नवीन पुरेपूर वास्तुशास्त्राचे नमुने दिसतात. अगदी ब्रुकलीन मधील १६५६ साली
उभारलेलं “saltbox style Pieter
Claesen Wyckoff House” असो
नाही तर “One World Trade
Center” ही गगनचुंबी इमारत असो...
एकूण पाहण्यायोग्य महत्वाची
आणि प्रेक्षणीय स्थळे म्हणजे Midtown Manhattan,
Times Square, the Unisphere, Brooklyn Bridge, Lower Manhattan with One World
Trade Center, Central Park, United Nations Headquarters, आणि Statue of Liberty.
शहरात बर्याच जुन्या आणि
कलात्मक बांधकामांनी नटलेल्या मोठ्या मोठ्या इमारती दिसतात. काही भागांत चकचकीत
भपकेदार इमारती एखाद्या काचेच्या कारखान्याला शहरीकरणाची जवाबदारी दिल्याप्रमाणे
बांधलेल्या आढळतात. एकूण शहराचा दिमाख काही औरच. फिरायला तुम्हाला प्रत्येक ठिकाणी
सवड काढून जायला पाहिजे.
पायी सुद्धा फिरत असाल तर
एक एक ऐतिहासिक इमारत कुठून न कुठून डोकावतच असते. सप्टेंबर २०११ च्या हल्यात
जमीनदोस्त झालेल्या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ चा सुद्धा झीरो ग्राउंड सर्व towers
मध्ये एक आगळे वेगळे काहीसे त्या गजबजाटात खोल पोकळीप्रमाणे आभास देतो. खास वेळ
काढून बघण्यासारखी महत्वाची ठिकाणे म्हणजे अर्थातच “टाईम स्क्वेर” आणि ”स्टेच्यू
ऑफ लिबर्टी”. जबरदस्त सुरक्षा व्यवस्थेत असलेली ही दोन्ही ठिकाणे.
स्वातंत्र्य देवतेचा पुतळा
हिरव्या रंगात समुद्राच्या मध्यभागी बेटावर उभा आहे. त्या देवतेने पेटवलेली
स्वातंत्र्याची मशाल तेथील प्रत्येक लहान मोठ्यानच्या हृदयात स्वातंत्र्य जागते
ठेवून आहे. आजही तिथे जन्माला आलेली
भारतीय असोत वा अमेरिकन...”इट इज माय लाईफ..” “माझ्या आयुष्याचे मी निर्णय घेईन...”
असेच प्रत्येक जण खडसावून सांगत असतो.
(pic by madhu nimkar)
(pic by madhu nimkar)
“नायगारा फॉल्स” ला बघणे
म्हणजे निसर्गाचा अवाढव्य आवाका एका छोट्याश्या(?) तुकड्यात बसवून बनवलेलं एक प्रेक्षणीय स्थळ. इथे छोट्याश्या
लिहिल्याने माझ्यावर नक्कीच मोठ्या-मोठ्या मुक्त टीका केल्या जातील... परंतु एक
अतिविशाल पाण्याचा धबधबा न्यूयॉर्क,अमेरिका आणि ओन्तारिओ, कॅनडाच्या सीमेच्या
मध्यावर आहे आणि आपण त्याला तंत्रन्यानाच्या आधारे जवळ जाऊन बघू शकतो, रंगीत दिवे
लाऊन सुशोभित करु शकतो व कॅमेरात कैद पण करू शकतो.....ह्या करिता त्याला छोटा
म्हणायचे धाडस केलं मी खरे तर!
दृष्टी जाईल त्यापलीकडे
दूरवर पसरलेला अवाढव्य, विशालकाय, महाकाय, मनमोहक, अतिसुंदर, जणू स्वर्गातून थेट
जमिनीवर त्याचे पाय लागले असतील इतका शक्तिशाली आणि तितकाच सुंदर धबधबा तो फक्त
“नायगारा”च असू शकतो.
Pic by madhu nimkar
हा धबधबा तीन भागात
विभागलेला आहे. ‘हॉर्स शू फॉल्स’ (२६०० फूट किंवा ७९२ मीटर) हा कॅनडाकडील बाजूचा,
व अमेरिकन फॉल्स (१०६० फूट किंवा ३२३ मीटर) व ब्रायडल वेल फॉल्स हा अमेरिकेच्या
बाजूकडील. त्याला पाणी नायगारा नदीतून मिळते.
“मेड ऑफ द मिस्ट” आणि “केव्ह ऑफ द विंड” अश्या दोन सहलींच्या प्रकारे नायगाराला
जवळून बघता येते. एवढ्या प्रचंड ताकदीच्या अवाढव्य धबधब्याला बघून तोंडात बोटे
घातली तर नवल नाही. सेव्हन वंडर ऑफ द वर्ल्ड मध्ये त्याचा समावेश नाही, ह्याचे
राहून राहून आश्चर्य मात्र वाटते...
त्याचे ते रूप कधीतरी जवळ
जाऊन बघतांना मनात भीती पण आणते....मग डोळे घट्ट मिटून आपण त्याचे अंगावर उडणारे
तुषार अनुभवतो व सर्व भीतीचा आपल्याला विसर पडतो.
नायगार्याच्या जवळ जायला
तिथे रेनकोट व स्लीपर्स दिल्या जातात...लांबच लांब रांगेत उभे राहून आपली नायगारा
जवळून बघायची उत्सुकता केवळ वाढीस लागते.
नायगारा साठी एक पूर्ण दिवस
राखीव पाहिजे...
अमेरिकेची राजधानी कशी काय
दिसते ह्याचं कुतूहल मनाला लागलं. ओबामा चं घर किती मोठं आणि राजेशाही आहे?
‘व्हाईट हाऊस’ आणि ‘वाशिंगटन डी सी’.....बस शेवटची दोन ठिकाणे बघितली की अमेरिका
दर्शन पूर्ण झालं आमचं असं आम्ही ठरवलं होतं.
ओबामाच्या घरासमोर उभे
राहून सर्वन प्रमाणेच फोटो घेतले, त्याचा बगीचा चौफेर फेरफटका मारून बघितला.
फर्स्ट लेडी आपल्या मुलांना ह्या बागेत खेळायला आणते का? ओबामाचे ओझरते का होईना
दर्शन व्हावे...अश्या बर्याच समजायच्या आणि अनुभवायच्या गोष्टी पूर्ण होऊ शकल्या
नाहीत. ‘व्हाईट हाऊस’च्या समोरील काही रस्ते बंद ठेवण्यात आले होते.
समोर कडक पोलीस बंदोबस्त
आणि ‘व्हाईट हाऊस’च्या समोर धरणे देऊन घोषणा देणारे एक-दोन एक-दोन माणसांचे दोन
संघ, हातात काही लिहिलेले कागद. समोर पोलीस उभे परंतु कुणीही त्यांना थांबवायला
पुढे सरसावत नाही.
ह्यालाच बहुधा म्हणतात
स्वातंत्र्य देवतेचे गाव...
--मधु निमकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा