हळू हळू
इंडीकेश्न्स देत माझ्या फोनने एक दिवस पूर्ण राजीनाम्याचा अर्जच समोर
ठेवला....आत्तापर्यंत आलेले वारंवार ‘हेंग’ होऊन बंद पडण्याच्या धमक्यांचे संकेत
दुर्लक्षित केल्याच्या परिणामांना सामोरी जायची ही आलेली निर्वाणीची वेळ. संकेतांचा
अन्वयार्थ न लागल्याने आपल्या मागण्यांवर अंमल बजावण्यासाठी बहुआयामी बंद पुकारून
अखेर मला साष्टांग नमन करायला लावणाऱ्या माझ्या फोनने मागण्यांची दिसायला किरकोळ परंतु वजनदार,
भारीभक्कम यादी माझ्याकडे इंजिनियर्स कडून टोलावली. वर वार्षिक सुट्टीचा फायदा
सुद्धा निमुटपणे मान्य करण्याव्यतिरिक्त माझ्याकडे पर्याय राहिला नाही. त्यात
देखील सतरा ठिकाणी धक्के खाऊन वाट चुकलेल्या जनावरागत एकदाची फोन दुरुस्तीच्या
दुकानात warranty च्या कागदासकट पोहोचलेली मी!... त्यांनी दिलेला पत्ता चुकीचा,
माणसे चुकीची, इतपत ठीक परंतु दोन दोन दिवस फेर्या मारून वर एक-दोन आठवडे फोन ताब्यात
नसणे म्हणजे फारच झाले....
घरी परत आल्यावर जीवाची
घालमेल झाली!....फोने नाही तर लाइफ ठप्प!!.....केलिफोर्निया व टेक्सास च्या
आठवणींना पुन्हा नव्याने उमाळा आला..... चांगला दोन वेळा ह्यांचा व तीन वेळा माझा
फोन अमेरिकेत मामुली कारणाने बिघडला असे घोषित झाले होते....फोनला चांगली दोन
वर्षांची warranty होती, त्यामुळे कंपनीने तात्काळ माझा जुना फोन ताब्यात घेऊन
काही मिनिटात नवाकोरा फोन बदलून आमच्या हातावर ठेवलेला. दोन्ही फोन ‘apple’ कंपनीचे
असल्याने त्याच्या दर्जात तृटी काढण्याची
बिशाद कुणाची नव्हती. आत्ता तर विश्वास अजूनच दृढ झालेला!!
असो...”मम्मा,
मम्मा” करणाऱ्या आमच्या बच्चाला घेऊन यायला अजून वीस मिनिटे बाकी होती. गप्पा अगदी
रंगलेल्या, शाळेची वेळ व्हायचाच अवकाश होता निघायला!.... दारावर अचानक काही तरी
ओरबाडल्याची जाणीव झाली..... काही मिनिटात त्या ओरबाडण्याचा आवाज तिव्र होऊन
दारावर धडक मारल्याची जाणीव व्हायला लागली. दरवाजाच्या फटीतून मैत्रिणीने बघण्याचा
प्रयत्न केला तर बाहेर कुणी तरी जनावर असल्याचे तिला दिसले. त्याचा कर्णकर्कश्य
आवाज कानठळ्या बसवणारा आणि हिंस्त्रक होता. जनावराला वेड लागलेले असावे असेच वाटत
होते अगदी ...
ते पिसाळलेले जनावर
‘यमदुतासारखे आमचे काम आज तमाम करणारच’ ह्या इराद्याने आमचा पिच्छा सोडत नव्हते.
त्याचा आक्रस्थाळेपणा शिगेला पोहोचलेला. तो सर्व आवाज अक्षरशः आमच्या कानात घुमू
लागला व आमची बेचैनी वाढली.
मैत्रिणीने तशीच धावत जाऊन रडत-रडत मुलीला मिठी मारली व तिचे मुके घेतले....मुलीने आमच्या
कडे खळखळते हास्य करून “मम्मा, आज हम ने ये किया....” सांगायला सुरुवात केली!!!!

तंत्रन्यानाचा
प्रचंड वेग, बाजारपेठेतील वेगाने होणारी उलथापालथ, व्यावसायिकपणा ह्यात अमेरिका
किती पुढारलेली आहे ते एका फोन वरून देखील दिसून येते. तोच फोन बर्याच महिन्यांनी
मुंबईत लौंच केला गेला. त्या वेळी आम्ही भारतात परत देखील आलो होतो.
तंत्रन्यानाबरोबरच
अमेरिकन लोकांचे प्राणीजीवनावरचे अचाट प्रेम देखील जगप्रसिध्द आहे. त्याचा एक छोटा
किस्सा....
दुपारच्या वेळी
कधी ग्रोसरी मार्केट, कधी मॉलमध्ये शॉपिंगला, तर कधी मैत्रिणीच्या घरी गप्पा
मारायला, पार्टीला, असा माझा दिनक्रम झालेला. लाडक्या मैत्रिणीने फोन करून,“तुझ्याकरीता
strawberry milkshake बनवलंय घरी येच...!”, अशी गळ घातल्यावर न जाणे अवघड होते,
आणि घर देखील जवळच दीड-दोन मैलावर होते. तिच्याकडे जायला मला कधीच कंटाळा यायचा
नाही. त्यांची गाडी तिचा नवरा कामावर घेऊन जायचा, त्यामुळे तिला बाहेर जायचं असेल
तेव्हा ती आमच्या एखादी बरोबर किवा नवर्याला गाडी घरी तिच्यासाठी ठेवायला सांगून
बाहेर पडत असे. आमच्यात सर्वात उत्साही आणि सर्वात लहान म्हणून ती लाडकी होती,
त्यात आम्ही दोघीही भटक्या!!!
तुरळक पावसाला
चुकवत गाडीने तिच्या घरी मी पोहोचले....गप्पा रंगल्या...बाहेर हवा थंड होती, परंतु
घरात हीटर चालू असल्याने सर्व काही ठीक वातावरण होते. २४ वर्षांची सर्वात मॉडर्न
नॉर्थ इंडियन मैत्रीण, आणि तिला ‘के.जी.’ मध्ये शिकणारी मुलगी.... त्या छोट्या
बाहुलीला घेऊन आम्ही खूप मजा करायचो. कधी तिच्या शाळेत पार्टी असायची, तेव्हा
वर्गा बाहेर उभ्या राहून ती आणि वर्गातील लहान मुले काय ‘activity’ करतात ते
बघायला खूप मजा यायची! शाळा सुटल्यावर टीचर मुलांचे किस्से भरभरून सांगायची!!!!....
आम्हाला बघून तिची मुलगी देखील धाव्वत येऊन गळ्यात मिठी मारायची दोघींच्या, तोच
मोह मी तिथे भेट देण्यास कदाचित कारणीभूत होता ... माझ्या कॅलिफोर्नितील
मैत्रिणीच्या मुलाला एका खाजगी शाळेत टाकलेलं, तो ‘प्री के. जी.’ मध्ये होता. त्त्याच्या
बरोबर लंच घेणे, गाणी म्हणणे वगैरे पूर्ण वेळ आम्हाला जायला परवानगी होती!!
असो...”मम्मा,
मम्मा” करणाऱ्या आमच्या बच्चाला घेऊन यायला अजून वीस मिनिटे बाकी होती. गप्पा अगदी
रंगलेल्या, शाळेची वेळ व्हायचाच अवकाश होता निघायला!.... दारावर अचानक काही तरी
ओरबाडल्याची जाणीव झाली..... काही मिनिटात त्या ओरबाडण्याचा आवाज तिव्र होऊन
दारावर धडक मारल्याची जाणीव व्हायला लागली. दरवाजाच्या फटीतून मैत्रिणीने बघण्याचा
प्रयत्न केला तर बाहेर कुणी तरी जनावर असल्याचे तिला दिसले. त्याचा कर्णकर्कश्य
आवाज कानठळ्या बसवणारा आणि हिंस्त्रक होता. जनावराला वेड लागलेले असावे असेच वाटत
होते अगदी ...
मुलीची शाळा
सुटायला आता फक्त पंधरा मिनिटे शिल्लक होती. आजूबाजूला राहणाऱ्या मैत्रिणी आज उपलब्ध
नव्हत्या व आमच्या पतीदेवानपैकी कुणीही एवढ्या कमी अवधीत ऑफिसमधून मदतीला येणे
शक्य नव्हते. वेळ संपल्यावर एक मिनिटही अधिक कुणी अमेरिकेत काम करत नाहीत. वेळेत
गेलो नाही तर शाळेला कुलूप लावले जाईल ह्या भीतीमध्ये भर म्हणून त्या जनावराच्या
ओरबाडन्याने आणि किंचाळण्याने काहीही सुचत नव्हते. ब्लॉकच्या galleryमध्ये जाऊन मैत्रिणीने
काहीतरी बाहेर भिरकावण्याचा दोन वेळा केलेला प्रयत्न साफ आपटला. एक तर नेम चुकला
आणि दुसरे म्हणजे ते जनावर खालून gallery मध्येच चढून येण्याचा प्रयत्न करू लागले.
घाबरून तिने gallery चे दार बंद केलं. म्हणून मला सुद्धा काही करणे शक्य झाले
नाही.
ते पिसाळलेले जनावर
‘यमदुतासारखे आमचे काम आज तमाम करणारच’ ह्या इराद्याने आमचा पिच्छा सोडत नव्हते.
त्याचा आक्रस्थाळेपणा शिगेला पोहोचलेला. तो सर्व आवाज अक्षरशः आमच्या कानात घुमू
लागला व आमची बेचैनी वाढली.
वेळ कमी होत
चाललेली....त्यात पिसाटलेले जनावर अगदी ऐकत नव्हते. त्या प्रकाराने सहनशक्तीच्या
मर्यादा ओलांडल्या... आता मात्र मैत्रिणीची पुरती गाळण उडाली, घाम फुटला तिला,
थरथरून तोंडातून शब्द बाहेर पडेना तिच्या, धीर एकवटून आम्ही पुन्हा दारातून
ते गेले का बघायला जायचो तर पुन्हा ते
रानटी जनावर आमच्यावर प्राणघातक झेप घ्यायला झपाट्याने पुढे सरसावायचे, जोरात
दरवाजावर धक्के मारायचे....थरकापाने शेवटी मैत्रीण ओक्साबोक्शी रडायला लागली....मी
देखील चिंतेत पडले. माझा मुलगा यायला बराच उशीर होता म्हणून मला वेळेची चिंता
नव्हती.
मुलीची शाळा
सुटायला आता फक्त पाच मिनिटे शिल्लक होती....शेवटी मी ९११ ह्या अमेरिकेच्या तत्काळ आपत्कालीन हेल्पलाईनची मदत घ्यायचं
ठरवलं. फोनवर सर्व सविस्तर ऐकून घेतल्यावर, “असल्या कामांना आम्हाला नाही ‘एनिमल रेस्क्यू’
टीमला बोलवा..” म्हणून सांगून फोन कट झाला. त्यांची समजूत काढण्यावाचून आमच्याकडे
तत्काळ कुठलाही पर्याय नव्हता....पुन्हा एकदा प्रयत्न करू ह्या विचाराने मी
त्यांना अखेरचा फोन लावला व आमची समस्या ऐकवली...
अखेर कुठल्यातरी
पुण्यायीने तो पोलीस अधिकारी अचानक आला आणि त्याने त्या जनावराला दरवाजातून क्षणात
घालवले...उंच तगडा उतारवयीन गोरा अमेरिकन पोलीस घराचा दरवाजा ठोकून आत आला, व
आम्हाला त्याने अधिकारवाणीत सांगितले....”एवढ्या शुल्लक कारणासाठी पोलिसांना कशाला
बोलावलत तुम्ही? ते बघा एक लहान मांजरीचं पिल्लु आहे ते! एक ग्लास थंड पाणी ओतलं
असतं अंगावर तरीही पळून गेलं असतं. बाहेर थंडी आहे म्हणून घरात ऊब घ्यायला यायचा
प्रयत्न करत होतं.....!!” आम्ही त्याला काही समजावण्याच्या मनस्थितीत
नव्हतो....शाळेची वेळ होऊन गेलेली!
एक भिजलेली लहान मांजर दोन दिवस तिच्या दरवाजात बसत होतं, व
शरणागती म्हणून घराच्या आश्रयाला येऊ पहात होतं. परंतु दारावरील लावलेल्या
पत्र्याच्या आवरणामुळे त्याचा आवाज वाघाने नखाने दरवाजावर ओरबाडावे इतका मोठा येत
होता.
अमेरिकेत अशी काही
जंगली मांजरे आढळतात, परंतु भटके कुत्रा किंवा गायी गुरे अन्य कोणीही मला कधी तिथे
आढळले नाही.
सिग्नल
चुकवत-पाळत जमेल तसे करून आम्ही शाळेत जाऊन पोहोचलो एकदाचे....सुदैवाने शाळा
अर्ध्या मैलावरच होती व मोक्याचे ठिकाण नसल्याने आडगल्लीत सिग्नलला केमेरा बसवलेला
नव्हता.
मैत्रिणीने तशीच धावत जाऊन रडत-रडत मुलीला मिठी मारली व तिचे मुके घेतले....मुलीने आमच्या
कडे खळखळते हास्य करून “मम्मा, आज हम ने ये किया....” सांगायला सुरुवात केली!!!!
-मधु निमकर
(दै. कृषीवल, मोहोर पुरवणी, स्तंभ: स्वातंत्र्यदेवतेच्या गावात १४/०९/२०१४)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा