गरीब कुटुंबातली 'मेरी कोम' लहान वयात आपल्याला बॉक्सिंग मधेच आवड आहे आणि त्यात करियर करायची इच्छा आहे असे घरच्यांना सांगून टाकते. नाक मोडणारे, चेहेरा खराब करणारे बॉक्सिंग करियर म्हणून निवडू नये म्हणून तिचे वडील त्याला विरोध करतात. त्यांच्या विरोधाला न जुमानता ती बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेऊन स्टेट, नेशनल, तसेच इंटरनेशनल लेवल वर आपले स्थान प्रस्थापित करते. वेळ प्रसंगी घरातील कर्जापायी विकलेली गाय मेल बॉक्सरला चेलेंज करून पैशानसाठी मार खाऊन सोडवते. "मुझे ब्रोन्झ पसंद नहीं आता..." सांगणाऱ्या तिच्या कोचचा,'तू मला केवळ पहिली आलेली पाहिजेस,' असा विश्वास त्यातून दिसतो. करीयरच्या एका उंचीवर आपल्या कोचच्या विरोधाला न जुमानता अचानक आपल्या मित्राच्या प्रेमात पडून ती लग्न करते व करियर सोडून स्वतःला संसारासाठी वाहून देते.
इतपर्यंतचा चित्रपट केवळ टिपिकल भारतीय धर्तीचा "कहानी घर घर की..." असे सांगत संपतो.
अचानकपणे लागलेली मातृत्वाची चाहूल तिच्या सर्व भविष्यातील योजनांवर विरजण टाकते. स्वतःची सर्व मेडल्स व प्रशस्तीपत्रके ती शोकेस मधून उचलून पेटीत बंद करते. त्या बरोबरच तिच्या मनातील बॉक्सिंग करियरवर सुद्धा ती एक प्रकारचे 'कफन' घालते. आपल्या मुलांसाठी जागा करायला पाहिजे म्हणून मी हे समान इथून दूर करते आहे हे सांगतांना तिच्या मनातले दुखः तिच्या डोळ्यातून तिच्या पतीना दिसते.
आपल्या दोन जुळ्या मुलांना घेऊन एक दिवस प्रवास करतांना एका मुलीचे पालक तिला सांगतात," तुम्ही मेरी कोम ची मैत्री आहात काय? आमच्या मुलीगी तिची मोठी फेन आहे. तिला मेरी कोम प्रमाणे बॉक्सर व्हायची इच्छा आहे. तुमची भेट होईल तेव्हा तिची स्वाक्षरी माझ्या मुलीला मिळवून द्याल काय?"....
मेरी कोम लोकांसाठी भूतकाळ आहे...... आपली गृहिणी आणि दोन मुलांची आई एवढीच आता ओळख आहे..... आपण कधी पुन्हा बॉक्सिंग करू शकणार नाही.... आपली फिटनेस राहिली नाही... ह्या विचाराने ती आधीच अस्वस्थ झालेली असते.
शेवटी दोघानपैकी एकाने तरी मुले व घर ह्यांकडे राहायला पाहिजे या जाणीवेने तिचे पती तिला घरच्या जबाबदारीतून मुक्त करून तिची व संपूर्ण घराची जवाबदारी एकट्याने स्वतःच्या अंगावर घेतात व तिला पूर्ण पाठींबा व योग्य परिस्थिती निर्माण करून देऊन पुन्हा उभे करतात.
आपल्या कोच गुरूनं शिवाय आपण बॉक्सिंगमध्ये विजयी होऊ शकत नाही हे 'मेरी' च्या लवकरच लक्षात येते.
लग्न, मुले, घरची जवाबदारी, अपयश ह्या सर्वांमुळे आत्मविश्वास गमावलेल्या मेरी मध्ये तिचे गुरु पुन्हा आत्मविश्वास आणतात. "मा बनने से औरत कि ताकत दुगनी होती है... " हे गुरूंचे शब्द ऐकुन तिच्यात धीर येतो. डबल ताकदीने 'मेरी कोम' आपल्या आयुष्याचा खरा लढा द्यायला बॉक्सिंगच्या रिंगणात पुन्हा एकदा उभी राहते.
ऐन कॉम्पिटीशन च्या वेळी तिच्या तान्ह्या मुलाच्या हृदयाला भोक आहे व त्याचे ओपेरेशन होत आहे हे ऐकून पुन्हा तिच्यातली भावूक स्त्री जागी होते. तिच्यातील नवचैतन्य संपून जाते, आणि ती कोलमडून पडते. आता नवीन कोच पुन्हा तिच्यात धीर आणतात, आणि शेवटच्या फेरीत ती स्पर्धा जिंकते. तिच्या बाळाचे हृदय ऑपरेशन मध्ये बंद पडलेले पुन्हा सुरु होते व ते वाचते.
.......आणि 'बोर्न टू वीन' खरे करून दाखवत 'मेरी कोम' चा पुनर्जन्म होतो!!!
- मधु निमकर.
अचानकपणे लागलेली मातृत्वाची चाहूल तिच्या सर्व भविष्यातील योजनांवर विरजण टाकते. स्वतःची सर्व मेडल्स व प्रशस्तीपत्रके ती शोकेस मधून उचलून पेटीत बंद करते. त्या बरोबरच तिच्या मनातील बॉक्सिंग करियरवर सुद्धा ती एक प्रकारचे 'कफन' घालते. आपल्या मुलांसाठी जागा करायला पाहिजे म्हणून मी हे समान इथून दूर करते आहे हे सांगतांना तिच्या मनातले दुखः तिच्या डोळ्यातून तिच्या पतीना दिसते.
आपल्या दोन जुळ्या मुलांना घेऊन एक दिवस प्रवास करतांना एका मुलीचे पालक तिला सांगतात," तुम्ही मेरी कोम ची मैत्री आहात काय? आमच्या मुलीगी तिची मोठी फेन आहे. तिला मेरी कोम प्रमाणे बॉक्सर व्हायची इच्छा आहे. तुमची भेट होईल तेव्हा तिची स्वाक्षरी माझ्या मुलीला मिळवून द्याल काय?"....
मेरी कोम लोकांसाठी भूतकाळ आहे...... आपली गृहिणी आणि दोन मुलांची आई एवढीच आता ओळख आहे..... आपण कधी पुन्हा बॉक्सिंग करू शकणार नाही.... आपली फिटनेस राहिली नाही... ह्या विचाराने ती आधीच अस्वस्थ झालेली असते.
शेवटी दोघानपैकी एकाने तरी मुले व घर ह्यांकडे राहायला पाहिजे या जाणीवेने तिचे पती तिला घरच्या जबाबदारीतून मुक्त करून तिची व संपूर्ण घराची जवाबदारी एकट्याने स्वतःच्या अंगावर घेतात व तिला पूर्ण पाठींबा व योग्य परिस्थिती निर्माण करून देऊन पुन्हा उभे करतात.
आपल्या कोच गुरूनं शिवाय आपण बॉक्सिंगमध्ये विजयी होऊ शकत नाही हे 'मेरी' च्या लवकरच लक्षात येते. लग्न, मुले, घरची जवाबदारी, अपयश ह्या सर्वांमुळे आत्मविश्वास गमावलेल्या मेरी मध्ये तिचे गुरु पुन्हा आत्मविश्वास आणतात. "मा बनने से औरत कि ताकत दुगनी होती है... " हे गुरूंचे शब्द ऐकुन तिच्यात धीर येतो. डबल ताकदीने 'मेरी कोम' आपल्या आयुष्याचा खरा लढा द्यायला बॉक्सिंगच्या रिंगणात पुन्हा एकदा उभी राहते.
ऐन कॉम्पिटीशन च्या वेळी तिच्या तान्ह्या मुलाच्या हृदयाला भोक आहे व त्याचे ओपेरेशन होत आहे हे ऐकून पुन्हा तिच्यातली भावूक स्त्री जागी होते. तिच्यातील नवचैतन्य संपून जाते, आणि ती कोलमडून पडते. आता नवीन कोच पुन्हा तिच्यात धीर आणतात, आणि शेवटच्या फेरीत ती स्पर्धा जिंकते. तिच्या बाळाचे हृदय ऑपरेशन मध्ये बंद पडलेले पुन्हा सुरु होते व ते वाचते.
.......आणि 'बोर्न टू वीन' खरे करून दाखवत 'मेरी कोम' चा पुनर्जन्म होतो!!!
- मधु निमकर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा