सामानाची
सर्व बांधाबांध करून झाली. अमेरिकेला
जाण्या साठी लागणाऱ्या गोष्टींची यादी पुन्हा पुन्हा तपासून काही राहिला नाही ह्याची खात्री करून घेतली. समानसुमान
कपडालत्ता, अगदी
छोट्यात छोटी गोष्ट सुद्धा माझ्या नजरेतून सुटली नव्हती.
परदेशात रहायला जाणार हे ऐकून प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी होती. पन्नास
लोकांनी तर माझ्या कडे आवासून बघितला नि म्हटलं, परदेशात
जाताय? जाऊ
नका....तिथे
काही नाही. आम्ही
होतो तिथे, कंटाळून
परत आलो ३ वर्षात...अमुक-तमुक.
एकाने भीती घातली तुम्ही फमिली बरोबर गेलात तर पैसे वाचणार नाहीत तुमचे....तिथे
खर्च खूप आहे. कशाला
जात तुम्ही?
एक काश्मिरी मैत्रीण म्हणाली तुम्ही तिथे कॉम्पुटर घेऊन जा घरचा, सांगा
घर पूर्ण नेतो आहोत. "हाउस शिफ्ट" म्हणून तुम्हाला पाहिजे तितका समान नेता येईल. तिथे
कॉम्पुटर आवश्यक आहेच. म्हणाली
माझी नणंद तिथे बरेच वर्ष राहते. तिथे
मसाले मिळत नाहीत. इथून
bag
भरून ती मसाले घेऊन जाते. मला
प्रश्न पडला एवढे मसाले नेउन काय करायचे? कान
डोळा केला थोड्या गोष्टीन कडे, नि
कमीत कमी म्हणजे आठ पंधरा दिवसाला पुरेल इतकं स्वयपाकाचा समान भरला bag मध्ये.
एक मैत्रीण म्हणाली "ऐय्या, परदेशात
जाते आहेस का तू? किती
छान...आमच्या
ह्यांना काय झाला परदेशात बघायला नोकरी...शी!!!
गेल्या गेल्या पंचाईत नको म्हणून डॉक्टर मैत्रिणीने काही औषधं लिहून दिलेली ते बरोबर घेतली.
छोटा मोठा लागणारं समान घेऊन जावं म्हणून मार्केट मध्ये गेली नि घरच्यासाठी
लागणारं जवळ जवळ सर्वच सामान घेऊन आली. मिस्टर
रागावले माझ्या वर, म्हणाले
कशाला घेऊन आलीस इतका सर्व? तिथे
सर्व मिलता, काही
न्यैचि गरज नाही इथून. उगाच
वजन वाढवू नकोस सामानाचा. इथे
घर बंद करून जायचं तर समान घेतलेला काय करणार, म्हणून
गुपचूप समान बेगेत भरून टाकला.
विमानात कमी वजनात जास्त समान भारता येईल ह्याचे सर्व मार्ग अवलंबले. मग
त्यात कमी वजनाचा म्हणून नवीन पोळपाट आला. घरातील extra म्हणता येतील अशी हलकीफुलकी भांडी आली.
तिथे इलेक्ट्रिक च्या शेगडी वर स्वयंपाक करावा लागणार म्हणून, सपाट
बुडाची भांडी घेतली विकत. ते
सुद्धा bag मध्ये कमी जागा व्याप्त करतील अशीच.
कॅलिफोर्निया
ला बऱ्यापैकी थंडी असणार म्हणून गरम कपडे आवश्यक होते. अगदी
सिमला काश्मीर ची सहाल आठवून आठवून जमा केले ते मी.
मिस्टर नको म्हणत असताना दोन तीन पंजाबी ड्रेस, एखाद
दुसरी साडी सुद्धा घेतली. चार बांगड्या, टिकल्या
हेय सुद्धा ओघ ओघाने आलं.
जायचा दिवस उद्या वर आलेला....शेजारच्या
साउथ इंडिअन काका काकू न भेटायला
गेले. मला
मुली प्रमाणे मानणाऱ्या काकूंच्या डोळ्यात पाणी आलं. तीन
पैकी दोन मुलगे परदेशात होते त्यांचे. मुलगा
परदेशात राहतो म्हणून स्वतःच्या घराला कुलूप लाऊन मुलाच्या घरी राहत होत्या त्या. सत्तरी
ला आलेला जोडपं, रोजच
काही न काही
कुरबुर चालू असायची त्यांची छोटी-मोठी. काका हार्ट पेशंट नि काकू diabetic . ऐकायचे नाहीत कधी तरी ते कुणाचा. पण
दोघांची मी खूप लाडकी होते. मी
जाताना काकू म्हणाल्या, "जावो तुम, मेरा
आशीर्वाद तुम्हारे साथ हे"
निघताना पाय जड झाले ते फक्त मायेच्या माणसांचा निरोप घेताना.
परत लवकरच यायचा आश्वासन देऊन, आनंद
नि दुख मिश्रित भावना काहीश्या घेऊन घेऊन बाहेर पडलो. आणि
एका नवीन दुनियेचा प्रवास सुरु झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा